गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:33 IST)

बेडकाला वाटत की मीच फुगलो आहे. पण, त्या फुगलेपणाचे काही खरे नसते -विरोधीपक्षनेते अजित पवार

ajit pawar
महाविकास आघाडीने पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडला आहे. अशामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी  पुण्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना महावि.कास आघाडीत बंडखोरी करून अप्सकः म्हणून उभे राहिलेले राहुल कलाटेंवरही टीका केली. ते म्हणाले की, "बेडकाला वाटत की मीच फुगलो आहे. पण, त्या फुगलेपणाचे काही खरे नसते," असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
 
अजित पवार म्हणाले की, "ज्यांचा अर्ज राहिला आहे, तो राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे, सचिन अहिर आणि प्रत्येकजण प्रयत्न करत होते. कोणीही अपक्ष राहू नका सरळ लढत होऊद्या. कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. ते सांगत होते की, एक लाखांच्यावर मते पडली. पण, ती शिवसेनेची मते होती. यामध्ये बोलवता धनी कोणी दुसराच आहे. कोणतरी सांगितले असेल कीअर्ज काढू नको. विरोधकांना वाटले असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर त्यांना निवडणूक सोप्पी जाईल. पण, कृपा करून कोणी रूसु आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडमध्ये विजय मिळवायचा आहे." असे ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor