गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (07:54 IST)

नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे खरे काय ते समोर येईल

vinayak raut facebook
खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर राज्याचे राजकीय तापमान पुन्हा वाढले होते. यावेळी रिया चक्रवर्तीला 'एयू' नावावरून ४४ फोन आले होते. असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावरून वादंग झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टचीही मागणी झाली होती. राणे पितापुत्रांनी हा विषय चांगलाच उचलून धरत शिवसेना ठाकरे गटावर चांगलीच टीका केली होती. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती.
 
खासदार विनायक राऊत म्हणाले की, "आदित्य राणेंवर नितेश राणे तोंडसुख घेत आहेत. परंतु, त्यांनी नारायण राणेंची कारकीर्द आठवावी. नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये जेवढे लोक गायब झाले, त्यावर एसआयटी चौकशी करावी. नारायण राणेंनी सख्ख्या चुलत भावाचे घरासमोर डोक फोडले. नंतर गाडीमध्ये घालून नांदगावला घेऊन जात तिकडेच जाळून टाकले. तसेच, नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे खरे काय ते समोर येईल. तसेच, कळेल की कोण हत्यारे आहेत आणि कोणाचा रक्तरंजित इतिहास आहे."
Edited by : Ratnadeep Ranshoor