1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (12:03 IST)

नंदुरबार स्थानकावर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस ट्रेनला आग लागली

ट्रेन ला आग लागण्याची घटना नंदुरबार येथे घडली आहे. ट्रेन मधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. 
सकाळी 10 :30 च्या सुमारास मोठा अपघात झाला. गांधीधाम-पुरी एक्सप्रेस ट्रेनला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेला आग लागल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रेनमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही गाडी नंदुरबार स्टेशनवर उभी होती. ट्रेनमध्ये किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ट्रेनच्या दोन बोगीत ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यात लागल्या आहेत.
 
ट्रेनच्या दोन बोगींना लागलेल्या आगीपासून प्रवाशांना वाचवण्यासाठी त्यांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं आहे . घटनास्थळी रुग्णवाहिका पथकही हजर आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनच्या बोगी वेगाने जळताना दिसत आहेत. धुराचे लोट पाहून आग भीषण असल्याचा अंदाज बांधता येतो. 
 
या घटनेबाबत रेल्वे मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या पॅंट्री कारमध्ये सकाळी 10.35 वाजता आग लागल्याचे वृत्तात म्हटले आहे. गाडी नंदुरबार स्थानकात येत असताना आगीची घटना घडली. अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन उपकरणांच्या साहाय्याने आग विझवण्यात येत आहे. पॅन्ट्री कार ट्रेनपासून वेगळी करण्यात आली आहे.