बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (11:15 IST)

फोटो व्हायरलच्या धमकीवर मुलीवर अत्याचार!

rape
शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका 37 वर्षीय व्यक्तीने मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल होतातच त्याने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. 

ठाणेच्या मुरबाड तालुक्यात एक गावात पीडित इयत्ता दहावीत शिकत असून आरोपीचे लग्न झाले असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. आरोपी पीडित मुलीचा शेजारी राहायचा. त्याची वाईट दृष्टी मुलीवर होती.

मुलीच्या घरच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये त्याने मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो काढले आणि तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मरेन अशी धमकी देत तिच्या वर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तिने आरोपी कडून दिला जाणाऱ्या त्रासामुळे शाळा आणि घरात जास्त राहत होती. तिच्या आईने तिची विचारपूस केली असताना तिने घडलेला प्रकार सांगितला नंतर 9 फेब्रुवारी रोजी आईने मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार केली.

पण पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार लिहिली नाही तर त्यांना बसवून ठेवले या बाबत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चंदने यांच्या कडे पोलीस कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार केली. या तक्रारीनुसार, त्या दिवशी ठाण्यात हजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रार दिली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य समजून पीडित मुलीच्या आणि आईची तक्रार नोंदवून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होतातच आरोपीने मित्र कडे जाऊन विषप्राशन  कडून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.   
 
Edited by - Priya Dixit