रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (15:20 IST)

ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई , 100 जणांना अटक

arrest
नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. पोलिसांची कडी नजर सर्वत्र असून पोलिसांनी ठाण्यात वडवली खाडीकिनारी येथे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली असून तब्बल 100 लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच लाखो रुपयांचे अवैध सामान देखील जप्त केले आहे. 
पोलिसांना ठाण्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या पार्टीतून पोलिसांनी काही तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे. त्यात 90 तरुणाचा सहभाग आहे तर 5 तरुणींना ताब्यात घेतले आहे. त्यांना रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांच्या कडून चारस, एमडी ड्रॅग, गांजा असे मद्यपदार्थ सापडले आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit