गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (13:59 IST)

Thane: गर्दीतून 17 वर्षीय मुलीचं अपहरण, आरोपी बॉयफ्रेंडला अटक

local train mumbai
मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करातात.दररोज लोकलला प्रचंड गर्दी असते. मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणाऱ्या गर्दीच्या लोकल मधून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यावर मुलीच्या बॉयफ्रेंडनेच तिचे अपहरण केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. 
 
हे प्रकरण आहे 12 ऑक्टोबर चे मुलगी बदलापूर ते विक्रोळी लोकल  प्रवास करत होती. दररोज प्रमाणे ती संध्याकाळी घरी पोहोचली नाही. बऱ्याच वेळ वाट बघितल्यावर ती घरी आली नाही. तर कुटुंबियांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी मुलीला संपर्क केला असता तिच्याशी संपर्क झाला नाही तिचा फोन बंद होता. 
आई वडिलांना मुलीची काळजी वाटू आगळी आणि ते पोलीस ठाण्यात गेले. तिच्या सोबत असणाऱ्या मुलानेच त्यांच्या मुलीचे अपहरण केले अशी शक्यता वर्तवली. 

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मुलाचा फोन ट्रेस केल्यावर त्याचे लोकेशन साताऱ्यात असल्याचे समजले. नंतर पोलिसांच्या पथकाने सातारा गाठले आणि सातारा पोहोचले. लोकेशनच्या ठिकाणी पोहोचल्यावर पोलिसांना त्या घरातून एका मुलाला बाहेर जातांना पाहिले  आणि त्याला ताब्यात घेतले.

घरात गेल्यावर त्यांना बेपत्ता झालेली मुलगी सापडली. पोलिसांनी तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि मुलाला अटक केली. मुलीने पोलिसांना सांगितले की, मुलाने तिला फसवून इथे आणले तर मुलाने ही स्वतः माझ्यासोबत आल्याचे म्हटले. पोलिसांनी त्यांच्या मित्रांची चौकशी केली असता त्यांनी मुलं-मुलीचे आपसांत  प्रेम संबंध असल्याचे सांगितले. पोलिसांनी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात देऊन मुलाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit