ओबीसी जनगणना करण्याची सरकारला भीती वाटते
नाशिक : देशभरात ओबीसी घटकांची संख्या पन्नास टक्के पेक्षा अधिक असल्यामुळे केंद्र सरकार ओबीसी जनगणना करण्यास घाबरत आहे.कारण जनगणना झाल्यानंतर ओबीसींची वाढीव आरक्षण द्यावा लागेल अशी भीती वाटत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री कॅप्टन अजयसिंग यादव यांनी केले.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या मंथन शिबिराच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर होते.दोन दिवस नाशिक येथे मुक्कामी होते.त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला.त्यावेळी सरचिटणीस राहुल यादव,महाराष्ट्र प्रभारी शितल चौधरी,उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत,प्रदेश उपाध्यक्ष मिलिंदचित्ते, शहराध्यक्ष गौरव सोनार,जिल्हाध्यक्ष अरुण नंदन ,अशोक खलाणे,यशवंत खैरनार,मयूर वांद्रे यांच्यसह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे योगदान देशभरातील लोकांना माहिती आहे.आठ वर्षात केंद्र सरकार ईडी आणि सीबीआय दबाब टाकून लोकशाही संपवायला निघाली आहे.ज्या लोकांनी भ्रष्ट्राचार केला ते डरपोक लोक भाजपच्या अमिषाला बळी कॉंग्रेस सोडून जात आहे.
आज देशांत जाती धर्मामध्ये तेढ पसरवून लोकांना आपापसांत लढण्यासाठी भाग पाडत असल्याने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशवासियांना जोडण्याचे काम करत असून लोकांचा चांगला प्रतिसाद या यात्रेला मिळत आहे.यात्रेच्या माध्यमातून देभारातील छोट्या पासून मोठ्या पर्यंत सर्व लोकांना भेटून चर्चा करत आहे.
आगामी काळात देशभरातील जास्तीत जास्त ओबीसी घटकांना लोकसभा ,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उमेद्वारी देण्यावर भर दिला जाणार असल्यामुळे देशभरात ओबीसी संघटन मजबूत करून कॉंग्रेस पक्षाच्या मागे उभे राहण्यासाठी देश पिंजून काढणार असल्याचा निर्धार यादव यांनी व्यक्त केला.