बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (15:21 IST)

बाप्परे, चक्क लहान मुलाने गिळले नेलकटर

नाशिक- चक्क नेलकटर गिळल्याचा प्रकार नाशिकमधील नाशिकरोड भागात घटला आहे. के. सी. मेहेता परिसरात 8 महिन्याच्या मुलाने चक्क नेल कटर गिळले. आशिष दीपक शिंदे असे या मुलाचे नाव आहे. गळ्यापासून पासून तब्बल 22 सेंटीमीटर आत हे नेलकटर गेलं होतं. वसंतराव मेडिकल कॉलेजच्या डॉ. शशिकांत पोळ यांच्या टीमने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर गळ्यात अडकलेले नेलकटर काढत यशस्वी शस्त्रक्रिया केली. 
 
मुलगा खेळत असताना हे नेलकटर गिळल्याटं त्याच्याच आईने सांगितलं.  लहान मुलांच्या हातात अनेकदा अशा गोष्टी जातात ज्या त्यांच्यासाठी धोक्याच्या ठरू शकतात. कामाच्या व्यापात तुमचंही मुलांकडे दुर्लक्ष होत असेल आणि त्यांच्या हाती अशाच वस्तू जात असतील तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे.