शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नांदेड , गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (22:40 IST)

'थर्माकोलच्या' होडीतून निघाले वऱ्हाड

tharmocal hudi
सततचा पाऊस अन नदीला आलेल्या पुर... लग्नविधीत विघ्न नको म्हणून नवरदेवासह वर्‍हाडातील सात आठ मंडळींनी चक्क थर्माकोलच्या हुडीवरून जवळपास 7 किलोमीटरचा जलप्रवास करत लग्न स्थळ गाठले. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून नवरदेव नवरीला वेळेवर हळद लागली आणि इतर विधीही पार पडले. 
 
विशेष म्हणजे हळदीचा कार्यक्रम यशस्वी पार करुन नवरदेवाचे नातेवाईक पुन्हा नदीतून ओलांडून करोडी गावाला पोहचले. नवरदेव मात्र लग्न असल्याने संगम चिंचोलीला थांबला आहे. वऱ्हाडी मंडळी संगम चिंचोली जाणार आहेत. आज दुपार नंतर पाऊस थांबल्याने पुर ओसरू लागला आहे. दरम्यान, नवरदेवाने लग्नासाठी चक्क जीव धोक्यात टाकून थर्मोकॉलच्या तराफ्याने प्रवास केल्याने याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे. आज लग्नाचा मुहूर्त असून दोन्ही घरी लगीनघाई सुरू आहे.