मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (07:52 IST)

येत्या 25 ऑक्टोबरपासून जिम आणि फिटनेस सेंटर्स उघडणार

उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि उपायांचे सक्तीचे पालन करूनच जिम, व्यायमशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगतानाच झुम्बा, स्टिम आणि सौना बाथ सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाहीही या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली. पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुंम्बा, योगा असे सामुहीक व्यायाम प्रकार ‘एसओपी’तील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.