सरकारने जिम आणि हॉटेल चालकांना परवानगी द्यावी : रोहित पवार

rohit panwar
Last Modified मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (13:11 IST)
देशात आणि राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. परंतु सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच यादरम्यान अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल चालकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली असली तर हॉटेल सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे जिम आणि क्लासेसवरही निर्बंध कायम आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी जर चालक काळजी घेण्यास तयार असतील तर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यास काय हरकत आहे, असा सवाल केला आहे.

“करोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता हॉटेल, जिम, क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
‘पुनश्च हरी ओम’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक जूनपासून राज्यात शिथिलतेचे पर्व सुरू केले खरे, पण त्या काळात मुंबई महानगर परिसर, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या वाढल्याने जून अखेरीस टाळेबंदीचे नवे पर्व सुरू करण्याची वेळ आली. जुलै महिन्यात राज्यभर विविध महानगरांत टाळेबंदी कठोर झाली. ऑगस्टमध्ये जनजीवन थोडे सुरळीत होऊ लागलं होतं. पण त्याचबरोबर करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढते आहे.

ऑगस्ट महिन्यात टाळेबंदी शिथिल करताना मॉल्स, व्यापारी संकुल, खासगी दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता बाजारपेठा खुल्या झाल्या, व्यवसाय सुरू झाले. परंतु जिम, हॉटेल, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनलॉकच्या पुढील टप्प्यात सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे खुली करावीत, जिम-व्यायामशाळांवरील निर्बंध दूर करा अशा मागण्या सुरू झाल्या होत्या.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.परकीय ...

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे

मोबाईलची डेटा स्पीड वाढविण्यासाठी हे करावे
आजच्या युगात मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन शिवाय कोणाचे ही काम चालत नाही. आणि जेव्हा गोष्ट ...

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू ...

Jio चा दररोज 3GB डेटा प्लॅन, किंमत 349 रुपयांपासून सुरू होते, वैधता 84 दिवसांपर्यंत
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना बर्‍याच योजना ऑफर करते, ज्यांची डेटाची मर्यादा वेगळी असते. ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची ...

इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या, 'बदला नक्की घेऊ' - सैन्याची प्रतिक्रिया
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आल्याचं इराणच्या संरक्षण ...