1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. The hearing on the power struggle will now be postponed to August 23

सत्तासंघर्षावर होणारी सुनावणी आता २३ ऑगस्टला होणार

सत्तासंघर्षावर होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, उद्या होणारी सुनावणी ही परवा म्हणजे २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे.
 
निवडणूक आयोगाची मुदतही २३ ऑगस्टला संपणार
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु आहे.
पुढील लेख
कंगना रनौत फिल्मफेअरविरोधात दाखल करणार खटला, कारण मात्र आहे जरा वेगळं