बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:40 IST)

राज्यात उष्णतेची लाट कायम

राज्यातली उष्णतेची लाट सोमवारीही कायम होती. अनेक ठिकाणी कमाल तापमान उच्चांकी पातळीवर राहिल्याने नागरिकांची होरपळ झाली. पुण्यातही 43 अंश सेल्सियस नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांमधील हे सर्वाधिक तापमान आहे. याशिवाय अकोला, परभणी आणि चंद्रपूर येथील तापमानाचा पारा 47.2 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. या शहरांसह राज्यातील अनेक ठिकाणी रविवारी नागरिकांनी सर्वात उष्ण दिवस अनुभवला.
 
पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार आहे. त्यानंतर बहुतांश भागातील तापमान कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ सुरू झाली होती. कोरडे हवामान आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर दिवसा आणि रात्रीच्या तापमानाने एकदम उसळी घेतली. परिणामी, गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आली आहे. येथे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंशांनी वाढले आहे. किमान तापमानातही वाढ झाली आहे. कोकण विभागातील तापमानही सरासरीच्या पुढे गेले आहे.