मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:23 IST)

13 राज्यांतील 97 जागांसाठी आज मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात गुरुवारी अर्थात आज 13 राज्यांतील 97 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम, छत्तीसगड, जम्मू- काश्मीर, मणिपूर, त्रिपुरा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या टप्प्यातील 97 मतदारसंघांमध्ये 1,635 उमेदवार रिंगणात आहेत.
 
महाराष्ट्राच्या दहा मतदारसंघांमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर यांचा समावेश आहे. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री अनुक्रमे सोलापूर आणि नांदेड मतदारसंघातून उभे आहेत. गेल्यावेळी मोदी लाटेतही नांदेड अजिंक्य ठेवण्याचा करिष्मा अशोक चव्हाण यांनी करून दाखविला होता. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे. तर सोलापुरात शिंदे यांच्यापुढे वंचित बहुजनच्या प्रकाश आंबेडकर यांनी व भाजपा उमेदवाराने आव्हान उभे केले आहे.