बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (09:25 IST)

औरगाबादला ओविसी करणार प्रचार, खैरे यांच्या अडचणी वाढल्या

शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पाचव्यांदा संसदेत जाण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागत आहे. या निवडणुकीसाठी एमआयएमने जोरदार प्रचार सुरु केला असून, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस मुक्कामी राहणार आहेत.  या काळात ओवेसी कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार असून,  एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादेतून एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
ओवेसी लवकरच  औरंगाबादचा दौरा सुरु करतील ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. 16 ते 19 एप्रिल या काळात ओवेसींकडून प्रचार करणार असून, एमआयएमचा मुख्य  मतदार असलेला मुस्लीम समाज औरंगाबादमध्ये अधिक संख्येने आहे. तर  औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने घवघवीत यश मिळवलं होतं.