गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:13 IST)

दगडूशेठ गणपती ट्रस्ट श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच करणार

यंदा पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याला गणेशभक्तांचीही उत्तम साथ मिळत असून आॅनलाईन दर्शन घेणा-यांची संख्या मोठी आहे. आता विसर्जन व सांगता सोहळ्याला देखील गर्दी होऊ नये, याकरीता दगडूशेठ गणपती ट्रस्टने श्रीं चे विसर्जन मुख्य मंदिरातच करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
 
 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८  व्या वर्षी सुरु उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी मुख्य मंदिरात दगडूशेठच्या श्रीं चे विसर्जन होणार आहे.
 
अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी. तसेच समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल.