शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (12:02 IST)

राऊत-सोमय्या वादातील जमीन मालक आला समोर, म्हणाला राऊतांकडून कोणताही दबाव नव्हता

भाजप नेते किरिट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील वाद हा वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. आता सोमय्यांनी एका जमीन प्रकरणी केलेल्या आरोपात, जमीन मालक समोर आला असून त्यांनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 
 
संजय राऊत यांनी अलिबाग याठिकाणी जमीन मालकावर दबाव आणत जमीन विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मात्र आता जमीन मालकच समोर आला असून त्यानं सोमय्यांचा आरोप फेटाळला आहे.
 
'मीच संजय राऊत यांना जमीन विकली. पण त्यात कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. खेळीमेळीच्या वातावरणात हा व्यवहार झाला,' असं त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
 
कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी पक्कं बांधकामच नसल्याचंही समोर आलं आहे.