शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (08:10 IST)

राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावं चर्चेत

prafful patel
सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांनी धीर ठेवावा आणि नेत्यांनी राजीनामे देणं थांबवावं, असं आवाहन पटेलांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच त्यांनी अध्यक्षपदाबाबत संयमी उत्तर दिलं.
 
सुप्रिया सुळे आणि तुमच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मी सध्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर काम करत आहे. हे पद माझ्यासाठी गौरवशाली आहे. मुंगेरीलाल के हसीन सपने मी पाहत नाही. मी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अजिबात इच्छुक नाही, त्याला मी तयारही नाही, असं प्रफुल्ल पटले म्हणाले.
 
पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राहिला विषय सुप्रिया सुळे यांचा.. तर एका चॅनेलला मुलाखत देताना छगन भुजबळ यांनी ताईंविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या त्यांच्या व्यक्तिगत भावना होत्या.
 
राष्ट्रवादीत संघर्ष असल्याच्या बातम्या केवळ माध्यमांमधून येतात. राष्ट्रवादीत कोणताही संघर्ष नाही. राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. शरद पवार कायमच सर्वेसर्वा असतील, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor