1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (09:35 IST)

सेल्फी काढत नवविवाहितेने आत्महत्या केली

The newlyweds committed suicide by taking selfiesसेल्फी काढत नवविवाहितेने आत्महत्या केली  Marathi Regional News  IN Webdunia Marathi
सासरच्या जाचाला कंटाळून बुलढाण्याच्या कठोरा येथे  एका नवविवाहित महिलेले टोकाचे पाऊल घेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जेवण बनवता येत नाही आणि हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सेल्फी घेतला आणि त्याचा फोटो आपल्या नातेवाईकांना पाठवून दिला नंतर गळफास घेतली. तिच्या कुटुंबियांना हे कळतातच त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि सासरचे मंडळी तिचा छळ कार्याचे तिला नेहमी स्वयंपाकावरून हिणवायचे, तिला हुंडा आणण्यासाठी त्रास द्यायचे .त्या त्रासाला कंटाळून तिने असे पाऊल उचलले. असा आरोप केला आहे. विवाहित महिलाच्या वडिलांनी केलेल्या आरोपावरून पोलिसांनी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.