गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:15 IST)

गुरांची संख्या झाली कमी,मात्र आश्चर्यकारक सत्य आल बाहेर

The number of cattle decreased
काही दिवसांपासून लोणावळा शहर आणि आसपासच्या परिसरातअचानकपणे गुरांची संख्या घटू लागलीय.त्यामुळे जनावरे गायब झाली कुठे? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. मात्र आता त्याचा उलगडा झालाय.गुरांच्या तस्करीसाठी एक टोळीच सक्रिय झालीय.मात्र गुरं चोरणा-या टोळीचा कारनामा समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. 
 
या घटनेत गुरांना खायला देण्याच्या निमित्तानं ही व्यक्ती त्यांच्याजवळ जाते आणि भुलीचं इंजेक्शन देते. ही टोळी भटक्या जनावरांना आपलं लक्ष्य करतेय.भूलीचं इंजेक्शन दिल्यानंतर या जनावरांना गाडीत भरलं जातं.हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर गुरं पळवणा-या टोळीविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ही जनावरं कत्तलखान्यात नेली जात असावीत असा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय.