शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (17:38 IST)

डॉक्टरसह तीन मित्रांकडून नर्सवर बलात्कार, दिवस राहिल्यावर विनासंमती गर्भपात केला

औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील एका हॉस्पिटल मध्ये  काम करणाऱ्या नर्सवर त्याच रुग्णालयाच्या एका 25 वर्षीय आरएमओ डॉक्टरने बलात्कार केला. एवढेच नव्हे तर या बलात्कारामुळे त्या नर्सला दिवस गेल्यावर तिला गर्भपाताच्या गोळ्या खायला देत तिचा विनासंमती गर्भपात देखील केला. या डॉक्टरसह डॉक्टरच्या तीन मित्रांनीही तिचा विनयभंग केला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडिता (नर्स) आणि आरोपी डॉक्टर हे एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतात. देशमुखने नोव्हेंबर 2021 पासून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पडेगाव येतील फ्लॅटवर व अन्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. डॉक्टरने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात करवला. यात पीडितेला प्रचंड वेदना झाल्यामुळे ती पुन्हा डॉक्टरकडे गेली. त्याने तिला मुकुंदवाडी भागातील नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्यावर बलात्कार केला आणि तिथून निघून गेला. त्याचा मावस भाऊ दीपक पाटीलने पीडितेवर बळजबरी करण्याचा  प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून ती बाहेर पडली. डॉक्टरचा मित्र आणि त्याच्या अनोळखी मित्र यांनीही तिचा विनयभंग केला. पीडिता सिडको बसस्थानकावर आली. तिची प्रकृती खालावलेली होती. यामध्ये तिची मदत दामिनी पथकाने केली.  तिनी पोलिसांची मदत घेतली. आरोपी डॉ. प्रसाद संजय देशमुख, हॉटेल मालक दीपक पाटील, एक अन्य मित्र आणि मेडिकल दुकानाचा चालक सचिन शिंदे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बागूल करीत आहेत.