सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (21:03 IST)

CSMIA चा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एकच गोंधळ

mumbai airport
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सर्व विमान कंपन्यांच्या चेक-इन आणि इतर कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्व्हर डाऊनमुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला असून प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे.
 
अधिकाऱ्याने सांगितले की, गर्दी हाताळली जात आहे. गर्दी वाढल्याने कोणताही गोंधळ उडाला नसल्याचे ते म्हणाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅन्युअल पास जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सिस्टममधील त्रुटीचे अचूक तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र, ही समस्या दूर करण्यात येत असून लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
या प्रकरणाबाबत एका प्रवाशाने ट्विट केले तेव्हा एअर इंडियाने सांगितले की, आम्ही गैरसोय दूर करण्यासाठी काम करत आहोत. एअर इंडियाने ट्विट केले की, ‘आम्ही समजतो की विलंब नक्कीच गैरसोयीचा आहे. आमची टीम गैरसोय कमी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत आहे. पुढील अपडेट्ससाठी ते तुमच्या संपर्कात असतील.
Edited by : Ratnadeep Ranshoor