नितेश राणे अटकेनंतर तुरुंगात पुस्तक वाचतानाचा फोटो व्हायरल …
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवली कोर्टाबाहेर मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.
अशातच सध्या सोशल मीडियावर नितेश राणे यांना तुरुंगात बसून पुस्तक वाचतानाचे एक छायाचित्र व्हायरल (photo viral) होत आहे. या छायाचित्रात तुरुंगातील कोठडीचे लोखंडी गज आणि त्यापलीकडे बसलेले नितेश राणे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे संतोष परब हल्लाप्रकरणात अटक होण्यापूर्वी अज्ञातवासात गेलेले नितेश राणे तुरुंगात आल्यानंतर इतके निवांत कसे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
मात्र, काहीवेळातच या छायाचित्रामागील खऱ्या कहाणीचा उलगडा झाला. हे नितेश राणे यांचेच छायाचित्र आहे, परंतू ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. पाच वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळूच्या प्रश्नावरुन राडा केला होता. त्यावेळी नितेश राणे यांना अटक झाली होती. तेव्हा नितेश राणे यांचे हे छायाचित्र टिपण्यात आले होते.