शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (21:12 IST)

आता नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकी दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भाजप आमदार नितेश राणे यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग हायकोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सिंधुदूर्ग हायकोर्टाकडून नितेश राणेंचा अर्ज फेटाळल्यानंतर आता नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामिन अर्जावर कधी सुनावणी होणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
 
नितेश राणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशांच्या प्रोटेक्शनमध्ये असल्याने त्यांना अटक करण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु न्यायालय जो काही निर्णय देईल त्या निर्णयाचे नितेश राणे पालन करतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. सिंधुदुर्ग कोर्टात नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल याची आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही लगेचच हायकोर्टात धाव घेतली. पुढील २-३ दिवसात या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी होईल असे देखील नितेश राणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.