सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (19:18 IST)

मोठी बातमी ! राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकार ने ओबीसी आरक्षणाबाबत विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची  माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्य सरकार कडून ओबीसी आरक्षणाबाबत तीनवेळा विधायक पाठविण्यात आले असून त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नव्हती. मंत्रिमंडळाच्या अनेक मंत्र्यांनी राज्यपालांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देखील अनेकदा राज्यपालांना या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी विनंती केली होती. अखेर राज्यपाल भगतसिंग यांनी ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने पाठवल्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.