रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (15:58 IST)

महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र

अहमदनगर जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई भासू लागली आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे लागत आहे.दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते. मात्र, तेव्हा टँकर सुरू केले जातात. यावर्षी प्रशासकीय यंत्रणा करोनासंबंधीच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे.
 
त्यामुळे टँकरसंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. मे महिना सुरू झाल्यानंतर दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढली आणि पठारभागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.येथील महिला, पुरुष, लहान मुले हंडे घेऊन पाणी आण्यासाठी डोंगर उतरुन खाली येतात. पुन्हा विहिरीतून पाणी शेंदून हंडा भरायचा आणि डोक्यावर दोन ते तीन हंडे घेवून डोंगर चढायचा, असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
 
वर्षांनुवर्षांपासून अशा पद्धतीने आदिवासी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भर उन्हात महिला पाणी वाहून नेत असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत आहे.