मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (17:11 IST)

पोलिसांनी चक्क दारूचे तळे शोधले, वाचा कोठे सापडले हे तळे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि १२ महिने शेतीला पाणी मिळावे म्हणून सरकारने शेततळ्याची योजना आखली आहे. अनेक शेतकरी या तळ्यांचा उपयोग करत शेती करत आहेत. मात्र थांबा, मद्यतस्करांनी त्याहीपुढे जाऊन नवीन शोध लावला आहे. दारू तस्करांनी चक्क दारुतळे तयार केले आहे. 
 
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील सदर जवळच्या भिवसनखोरी परिसरात हा अजब-गजब प्रकार उघडकीस आणला आहे. या आगोदर अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही ‘योजना’ पाहून जोरदार धक्का बसला होता. यामध्ये दारु तस्करांनी चक्क तळे बनवून त्यामध्ये दारु लपवली आहे. तर हे तळे दारूने काठोकाठ भरले आहे. निवडणुकीचं वारं जोरात असून, निवडणुकीत दारुचा वापर सर्रास केला जातो. अनेक ठिकाणी दारु पकडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आतापर्यंत पकडलेल्या दारुपैकी नागपूरमधील दारुच्या तळ्याचा हा किस्सा सर्वात आश्चर्यकारक आहे. यावर आता पोलिस कारवाई करत असून अजून कोठे या प्रकारे तळी अथवा दारूची साठवणूक केली आहे का याचा तपास जोरात सुरु केला आहे. या आयडीयाच्या कल्पनेने मात्र हे प्रकरण चर्चेचा विषय झाली आहेत.