रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बसचालकाने दारू तस्करीसाठी लढवली ही शक्कल

गुजरात राज्यात दारु बंदी आहे, त्यामुळे अनेक तळीराम कायदा मोडून दारू राज्यात आणतात आणि विक्री करतात, त्यामुळे पोलिसांची त्यांच्यवर करडी नजर असते. तर दारू इतर राज्यातून गुजरात येथे नेतांना दारू तस्कर अनेक युक्त्या लढवत असतात, अशीच युक्ती एका सरकारी कर्मचाऱ्याने लढवली आहे. मात्र पोलिसांनी त्यांला पकडले आहे. 
 
मात्र तेथील सरकारी कर्मचारीच दारु वाहतूक करताना पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून अवैद्यरित्या विदेशी दारु घेऊन जाणार्‍या बसचालकास अटक केली आहे. छावणी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने केलेल्या कारवाईत चालकाकडून १२ हजार ८२० रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली.
 
मालेगाव येथून गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून विदेशी दारुची विनापरवाना चोरट्या पध्दतीने वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली होती. पथकाने मालेगाव सटाणा रस्त्यावरील वैद्य  हॉस्पिटलजवळ सापळा रचला. यावेळी गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या मालेगाव-सुरत बसला (क्रमांक जी.जे.१८ झेड ४५५६) थांबवण्यात आले. बसची तपासणी केली असता बसच्या बॅटरी बॉक्समध्ये हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीत पेपरच्या कागदात १० विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत.

विदेशी बाटल्यांबाबत बसचालक व वाहकांकडे चौकशी केली असता बसचालक गोविंद शामराव वानखेडे (रा. भोपलगाव ता. दासतोई जि. अहमदाबाद) याने विदेशी दारूच्या बाटल्या विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.पोलिस अधिक तपास करत असून गुन्हा दाखल केला आहे.