शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (09:48 IST)

महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी : आरोपी निर्दोषमुक्त

सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमधून महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरीच्या घटनेला आता आठ वर्षे होत आली आहेत. या घटनेत सीआयडी चौकशी होऊन एकाला अटकही करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करत प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. आता न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोषमुक्त केलं आहे.
 
13 जून 2011 रोजी सेवाग्राम आश्रमाच्या वतीने चष्मा चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. सीआयडीने तपासादरम्यान आरोपी कुणाल राजाभाऊजी वैद्य, राहणार हिंद नगर याला अटक केली. तपासाअंती सीआयडीने वर्धा मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात भारतीय दंड विधानाचे कलम 380 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं. याचा निकाल लागला. न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केलं आहे.