बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मिशन शक्तीची तयारी २०१२ सालीच, कॉंग्रेसची मोदींवर टीका

भारताने मिशन शक्ती यशस्वी करत पूर्ण जगात  अंतराळात आपली ताकद दाखवली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी 300 किमी अंतराळात वर केवळ 3 मिनिटात एक लाईव्ह सॅटेलाईट यशस्वी लक्ष्य भेद केला आहे. लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आल्याची माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक करत मोदींनवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

मोदी  काहीतरी मोठी घोषणा करणार असं दिसत होते, वाटल की पाकिस्तानातून कोणीतरी दहशतवादी  पकडून आणलं आहे की काय असं आम्हाला वाटत होतं, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं. चव्हाण पुढे म्हणाले की अभिमानास्पद कामगिरी आहे, 2012 सालीच याबाबत आम्ही तयारी केली होती. पण अशी चाचणी झाली नव्हती. आपल्या देशाचे  तांत्रिक यश नक्की आहे. भारतान जगात एक पाऊल निश्चित पुढे टाकले आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.