गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (20:29 IST)

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील शिधा जिन्नसांचे दर जाहीर

ration card
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत डिसेंबर, २०२३ साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर जाहीर झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंबासाठीचे दर तांदूळ मोफत दराने प्रति व्यक्ती ३ किलो, गहू प्रति व्यक्ती २ किलो असे आहेत. अंत्योदय अन्न योजना – तांदूळ मोफत दराने प्रती शिधापत्रिका २० किलो, गहू मोफत दराने प्रति शिधापत्रिका १५ किलो व रु. २०/- दराने प्रति शिधापत्रिका १ किलो साखर (सुलभ पॅकिंगसह) असे आहेत.
 
बिगर गॅसधारक शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचे दर मुंबई शहर व मुंबई उपनगर (दि. १ डिसेंबर २०२३) नुसार रुपये 68.96  ठाणे विभाग (दि. 4 डिसेंबर 2023) नुसार (36/फ) रु. 69.35/-, ठाणे (41/फ) रु.69.35/-, मुंब्रा (48/फ) रु.69.35/-, वाशी (41/ फ) रु. 69.35/-, भाईंदर (41/फ) रु.69.35/-, कल्याण (38/फ) रु. 69.53/-, डोंबिवली (मुख्य) (39/फ ) रु. 69.53/-, डोंबिवली (उप) (39/फ) – 69.53, उल्हासनगर (मुख्य) (40/फ) रु. 69.61/-, उल्हासनगर (उप) (40/फ) 69.61, अंबरनाथ (46/फ) रु. 69.61/-, बदलापूर (46/ फ) रु. 69.61/-, भिवंडी (37/फ) रु. 69.44/- प्रति लिटर या प्रमाणे असून 1 व्यक्ती 2 लिटर, 2 व्यक्ती 3 लिटर व 3 व्यक्ती व वरील 4 लिटर वाटप करण्यात येईल, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी कळविले आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor