गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (10:02 IST)

दिल्लीत पावसाचे पुनरागमन! महाराष्ट्र-बिहारमध्ये अलर्ट

monsoon update
आज महाराष्ट्र-उत्तर आणि बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यात दिल्ली, महाराष्ट्र आणि बिहारच्या हवामानाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. आता हवामान बदलत असून मान्सून निरोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे.   
 
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. तर 1 ऑक्टोबरपासून राजधानी दिल्लीमध्ये संपूर्ण आठवडा कडक उन्हाचे वातावरण असू शकते. येत्या शनिवारपर्यंत दिल्लीत पावसाची शक्यता नाही. अशा स्थितीत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
 
तसेच पावसामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोकांना त्यांची दैनंदिन महत्त्वाची कामे करण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. हवामान विभागानुसार अंदाजानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून 1, 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पावसापासून थोडासा दिलासा मिळू शकतो, परंतु त्यानंतर 4, 5, 6 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात शनिवारी आणि रविवारी येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून आठवडाभर हवामान स्वच्छ राहील.  
 
तसेच संपूर्ण या आठवड्यात बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. 28 सप्टेंबरपासून येत्या शनिवारपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.  

Edited By- Dhanashri Naik