बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (09:00 IST)

येत्या ३० जूनला सेटची परीक्षा होणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) ३० जूनला होणार आहे. फेब्रुवारीमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, सेटसाठीही दोनच प्रश्नपत्रिका असतील. मात्र ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे.
 
नेट परीक्षेत बदल झाल्यामुळे सेटमध्येही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार सेटसाठी आता ३५० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली प्रश्नपत्रिका १०० गुणांसाठी, तर दुसरी प्रश्नपत्रिका २०० गुणांसाठी असेल. प्रश्नांच्या स्वरुपातही बदल करण्यात आले असून, पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी ६० ऐवजी ५० प्रश्न असतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत १०० गुण असतील. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी दिली.