मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 12 जानेवारी 2022 (18:15 IST)

राज्यातील दुकानावरील पाट्या आता मराठीतच

राज्यातील सर्व पाट्या आता मराठीतच असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मराठी भाषा जपून राहावी या साठी मराठी भाषेविषयी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या साठी या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. दुकानावरील पाट्या मराठीत आणि ठळक मोठ्या अक्षरात असाव्यात. हे करणे बंधनकारक असणार. ही माहिती राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता मोठ्या दुकानाप्रमाणेच छोट्या दुकानाच्या पाट्या ही आता मराठीत कराव्या लागणार. मराठी अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही. अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.. जरी दुकानात एकच व्यक्ती काम करत असेल तरीही दुकानाची पाटी मराठी भाषेतच ठेवावी लागेल.राज्याचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात घेतली आणि कायदा सुधारण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता राज्यातील दुकानातील सर्व पाट्या मराठीतच मोठ्या आणि ठळक अक्षरात असाव्यात.