मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (15:08 IST)

पाणीसाठय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठो कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे सलग चौथ्या दिवशीही तीन फुटांवर स्थिर

koyna dam
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून 26 हजार 332 क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. दरम्यान पाणीसाठय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठो कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे सलग चौथ्या दिवशीही तीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. या दरवाजातून विनावापर 19 हजार 417 व धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असे एकूण पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 21 हजार 517 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कोयना नदी पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोयना नदीवरील मुळगाव या महत्वपूर्ण पुलाला पाणी लागले असून नदीकाठच्या शेतीत पुराचे पाणी घुसले आहे.
 
मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या चोवीस तासात कोयनानगर येथे 54 मिलिमीटर (3609), नवजा 47 (4252) मिलिमीटर व महाबळेश्वर 75 (4711) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या   पाणीसाठा 96.75 टीएमसी इतका झाला असून पाणीपातळी 2156.11 फूट, 657.428 मीटर इतकी झाली आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  केवळ 8.05 टीएमसी पाण्याची गरज असून सध्या कोयनाधरण  91.52 टक्के इतके भरले आहे.