1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 जून 2024 (13:31 IST)

पावसाला धो धो सुरुवात!

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जसे की, कोकण, पुणे, सोलापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 
मुसळधार पावसाने सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कोसळण्यास सुरवात केली आहे. तसेच कोकणसह, सोलापूर आणि पुण्यामध्ये सकाळपासून पाऊस कोसळत आहे. तर पंढरपूरमध्ये शेतांमध्ये पाणी साचले आहे. 
 
तसेच महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये रात्री मोसलधार पाऊस झाला यामुळे रस्ते जलमय झाली व गावांकडे जाणारे रस्ते पाण्यामुळे बंद झालेत. 
 
मान्सून महाराष्ट्र राज्यात दाखल झाला असून हवामान विभाग अंदाजानुसार पुढील काही आठवड्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना म्हणजे सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली याठिकाणी यलो अलर्ट घोषित केला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर, बीड, सिंधुदुर्ग ठिकाणी माध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.  
 
सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ  आणि करमाळ्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील नरखेड येथे पाऊस चांगला प्रमाणात झाला असून आता दुष्काळ ग्रस्त भागातील नागरिकांना आता दिलासा मिळत आहे. शेतकरी आनंदाला आहे. 
 
तर सोलापुर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळला व पंढरपूर मधील रस्ते जलमय झालेत. प्रचंड उकाडा सहन केलेले पंढरपूरकरांना आता पावसामुळे आलाहदायक वाटत आहे. पण उपनगरांकडे जाणारे रस्ते पावसामुळे बंद झाले आहे. 
 
तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर शहर मध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट घोषित झाला आहे.