शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024 (17:40 IST)

राज्य सरकार या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मावर 50 हजार रुपये देणार!

eknath shinde
केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून जनतेसाठी अनेक फायदेशीर योजना सुरू केल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले जातात. या पैकी काही योजना मुली आणि महिलांसाठी असतात. आता महाराष्ट्रातील माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत मुलींना सक्षम केले जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थीने महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेचा उद्देश्य मुलींना सक्षमीकरण करणे आहे. 
 
योजना जाणून घ्या -
महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठीमाझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे.ही योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत सरकार 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.या योजनेचा लाभ अशा कुटुंबाला मिळणार ज्यांना दोन मुली आहे तसेच लाभार्थी महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असावा. 

अर्ज कसा कराल -
या योजनेत लाभार्थीच्या आई आणि मुलीचे संयुक्त खाते उघडले जाईल. तसेच योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार. 

योजनेंतर्गत 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. तर दोन मुली झाल्यानंतर पालकांना नसबंदीसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये मिळतात.
 

कागदपत्रे- 
या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड, पासबुक, फोटो, फोन नंबर आणि निवासी पत्र इत्यादी कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखल असणे गरजेचे आहे. 
Edited By - Priya Dixit