गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (21:40 IST)

पुण्यात स्वयंपाकाच्या वादावरून तरुणाची निर्घृण हत्या

murder
पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्वयंपाक करण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला, त्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्याची झोपेत असताना हत्या केली. हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मयत व्यक्ती झोपेत असताना आरोपीने त्याच्यावर लोखंडी रॉडने वार केले त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यात आरोपी मयतावर हल्ला करत आहे. 

या दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरून झालेला वाद या हत्येला कारणीभूत ठरला आहे. 
हे दोघे बिहारचे रहिवासी असून पुण्यातील चिंचवड मध्ये एका ऑटोमोटिव्ह कंपनीत कामाला होते.

दोघे सोबतच राहायचे त्यांच्यामध्ये स्वयंपाकावरून वाद झाला आणि आरोपी त्याच्यावर रागावला आणि रागाच्या भरात त्याने पीडित वर लोखण्डी रॉड ने हल्ला करत त्याला ठार केले. हल्ल्यांनंतर पीडितचा आरडाओरड ऐकूनआजूबाजूचे लोक जागे झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितला रुग्णालयात नेले तिथे त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit