पूर्वीपेक्षाही भव्य उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
ऑगस्ट महिन्यात दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि पुतळ्याची हानी झाली. आता या प्रतिमेचे पुनर्बांधणीचे काम सुरु होणार असून त्यासाठी कंत्राट ही देण्यात आले आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे कंत्राट महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.
या वर्षी 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी उंच पुतळा कोसळला होता. गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
पद्मश्री पुरस्कार विजेते शिल्पकाराचा मुलगा अनिल सुतार यांनी शनिवारी पीटीआयला सांगितले की, नवीन कांस्य पुतळा 60 फूट उंच असेल आणि 10 फूट उंच ठिकाणी स्थापित केला जाईल. या पुतळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हा पुतळा 60 फूट उंच असेल, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही. ब्राँझ आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करून हा पुतळा बनवला जाणार असून 6 महिन्यांत पूर्ण होईल.
सुमारे 40 टन कांस्य आणि 28 टन 'स्टेनलेस स्टील' या पुतळ्यासाठी वापरण्यात येणार असून ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit