गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (15:08 IST)

सहाय्यक पोलीस निरीक्षकाची सुसाइड नोट आली समोर

suicide
नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी ड्युटीवर असलेल्या पोलीस निरीक्षकाने टोकाचे निर्णय घेत आयुष्य संपविले होते.त्याने परळी रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वे खाली आत्महत्या केली असून त्यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळले होते. सुभाष दुधाळ असे या आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. आता त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला त्याचे कारण समोर आले आहे. ते सीआयडीच्या इओडब्ल्यू विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.   
त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण एका सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे. त्यांनी कौटुंबिक कारणातून असे टोकाचं पाऊल उचलले आहे. तसेच पोलीस दलातील अंतर्गत कहलामुळे ते अस्वस्थ होते. त्यांच्यावर एका प्रकरणात चुकीचा तपास, आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आयुष्य संपवत आहे अशी नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोट मुळे खळबळ उडाली आहे.  
 
Edited by - Priya Dixit