सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (09:05 IST)

त्र्यंबकेश्वर: बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी; बिबट्याचा शोध सुरू

leopard
त्र्यंबकेश्वर - तालुक्यातील पिंपरी येथे आज सायंकाळी शेतामध्ये काम करणाऱ्या एक महिला आणि एक पुरुष यांच्या वर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
नाशिक तालुक्यासह शेजारी असलेल्या त्र्यंबकेश्वर, निफाड, इगतपुरी, सिन्नर या परिसरामध्ये सातत्याने बिबट्याच्या वावर हा सुरूच आहे. सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, आज मौजे पिंपरी येथे काळू सोमा वाघ (वय 45) यांचे मालकी गट नंबर 232 मध्ये सायंकाळी 4.45 वाजता अचानक बिबट्याने हल्ला करून पाठीवर, हातावर पंजा मारून जखमी केले. त्यानंतर शेजारी असलेल्या ताराबाई विठ्ठल मूर्तडक (वय 35) यांच्या मालकीच्या गट नंबर 260/3 गोठ्यामध्ये शेण काढत असताना बिबट्याने पुन्हा अचानक हल्ला करून जखमी केले. त्यांचेवर त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे औषध उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकच्या सिविल हॉस्पिटल येथे दाखल केले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून शोध मोहीम सुरू केली असून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. गावामध्ये, मळ्यात मध्ये जनजागृती केली जात आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor