शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जानेवारी 2024 (20:16 IST)

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण त्र्यंबकेश्वर चरणी लीन

Trimbakeshwar
आद्यज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वरावर अतूट श्रध्दा असलेले मध्यप्रदेशचे मा. मुख्यमंत्री मा. शिवराज सिंह चौहान यांनी सहकुटुंब त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन विधीवत अभिषेक पूजन केले. गेले तेवीस वर्षे सुरु असलेल्या व्यक्तीगत प्रथेप्रमाणे इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरवातीला आद्य ज्योर्तिलींग त्र्यंबकेश्‍वराचे रूद्र अभिषेक पूजन करून दर्शन त्यांनी घेतले.
 
यावेळी पुजन संकल्प करतांना  येणारे वर्ष सर्व देशवासियांना आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना यावेळी मा. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रभु त्र्यंबकराजास केली.
 
पौरोहित्य श्रीनिवास गायधनी सुयोग वाडेकर पराग धरणे तन्मय वाडेकर,जयदीप शिखरे, बाळासाहेब कळमकर यांनी केले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे विश्वस्त मनोज थेटे व रूपाली भुतडा  यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपा नेते श्रीकांत गायधनी जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर शहराध्यक्ष प्रशांत बागडे युवा मोर्चा अध्यक्ष अलोक लोहगावकर महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव वैष्णवी वाडेकर नीलिमा धारणे सुवर्णा वाडेकर आदी उपस्थित होत्या.