बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (09:39 IST)

शाळेतच पतीकडून शिक्षिकेची कुऱ्हाडीने हत्या

गोंदिया जिल्ह्यातील इर्री टोला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची तिच्या पतीने कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. प्रतिभा डोंगरे असे या शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. शिक्षिका प्रतित्रा डोंगरे शाळेत असताना त्यांचा पती दिलीप डोंगरे शाळेत आला. यावेळी प्रतिभा आणि त्यांच्या पतीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे सुरु असतानाच आरोपी दिलीप डोंगरेने शाळेतच प्रतिभा यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यातच प्रतिभा यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी दिलीप डोंगरे पसार झाला आहे. अद्याप या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसून पोलीस याचा तपास करत आहेत.