बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (10:20 IST)

पाण्याची तहान घरात तीन महिला आणि त्याचा ठेचून झाला खून

कोण कोणत्या समजुतीतून खून करेल याचे काही सांगता येत नाही, असाच प्रकार मुंबई येथे घडला असून शुल्लक कारणातून गैर समज निर्माण झाला आणि एकाचा दोघांनी ठेचून खून केला. त्यात विशेष म्हणजे तीन महिला या प्रकरणात असल्याने हा घोळ झाला आहे.
 
मुंबई येथील कामण-भिवंडी रोडवरील पोमण गावात एका ४० वर्षीय व्यक्तीचा काठीने मारहाण करुन आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या गुन्ह्याच तपास करून वालीव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत गैरसमजुतीमधून खून झाल्याचे उघड झाले आहे.सजीव दत्ता (वय-४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चिंतामण धर्मा भुरकुंड (वय -४५) आणि पुतण्या साईराज गजानज भुरकुंड (वय -२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरातील एका मैदानात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. उन्हाळ्यामुळे मयत संजीव एका घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी बाजूला बसलेल्या आरोपींना वेगळेच वाटल्याने त्यांचा गैरसमज झाला. मयत संजीव हा घरात पाणी पिण्यासाठी गेला त्यावेळी घरामध्ये तीन महिला होत्या. त्यामुळे आरोपींनी संजीव दत्ता याला काठीने मारहाण केली. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात नेऊन टाकला.पोलिसांनी केलेल्या तपासात संजीव दत्ता हा पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरात नोकरीच्या शोधात आला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपींच्या गैरसमजुतीमधून हा गुन्हा घडल्याचे उघड झाले.