पोहण्याचा मोह जीवावर बेतला ,नदीच्या पात्रात बुडून चौघांचा मृत्यू
कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन लावण्यात आले होते.मात्र आता लॉक डाऊन उघडले गेले आहे त्यामुळे कंटाळलेली जनता घरातून बाहेर पडून आनंदाचा वेळ घालविण्याचा विचार करीत सहलीला जाण्याचे बेत उत्साहाने आखत आहे.असा हा उत्साह चार लोकांसाठी जिवघेणा ठरला आहे.आज नागपूरजवळच्या वाकीजवळ कन्हान नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
झाले असे की नागपूर येथे रहिवासी असलेले आठ तरुण मुलं सहलीसाठी सावनेर तालुक्यातील वाकी येथे आले होते.त्यांना तिथे गेल्यावर द्वारका वॉटरपार्क बंद दिसले.त्यामुळे ते जवळच कन्हान नदीच्या पात्रात फिरायला गेले असताना त्यांनी वाहत्या पाण्याला बघून पोहायचे ठरवले. त्या आठ तरुणांपैकी चार त्या पाण्यात पोहण्याठी उतरले त्यांना पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे ते चौघे बुडायला लागले.इतर चौघांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती निराशा आली.आणि पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळतातच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गोताखोरांच्या मदतीने चौघांचे मृतदेह शोधण्यास सुरु केले.त्या चौघांपैकी फक्त एकाच तरुणाचे मृतदेह गोताखोराना सापडले आहे.अद्याप तिन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु आहे. त्या परिसरात पाऊस सुरु असल्याने मृतदेह शोधायला अडचण येत आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार वाकी येथील कन्हान नदीपात्र खूप खोल आहे त्यामुळे त्या ठिकाणी पोहण्यास सक्त मनाई असल्याचे फलक देखील लावलेले आहेत.मात्र या तरुणांना इथे पोहण्याच्या मोह आवरता आला नाही त्यामुळे त्यांना हा मोह त्यांच्या साठी जीवघेणा ठरला.