शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (10:07 IST)

फडणवीस बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार - संजय कुटे

devendra fadnavis
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार देवेंद्र फडणवीसच आहेत, असं विधान माजी मंत्री आणि भाजपचे नेते संजय कुटेंनी केलंय.
 
संजय कुटे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या इतिहासातील हे ऐतिहासिक सत्तानाट्य होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस या सर्व यशाचे सूत्रधार होते. त्यानंतर जे घडलं त्यामुळं भाजपतले काही लोक नाराज झाले असतील पण फडणवीसांसारखा त्यागमूर्ती असलेला नेता या महाराष्ट्राला मिळाला याचं आम्ही भाग्य समजतो."
 
तसंच, "सत्तेसाठी आम्ही हे केलेलं नाही. ज्या विचारांवर आम्ही जगतो आहे त्याला गेल्या अडीच वर्षांत तडा जात होता. यामुळं हिंदुत्वाचे विविध विषय मागे पडत होते. सन 2019 मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपचं सरकार लोकांनी निवडून दिलं होतं, ते हिंदुत्ववादी सरकार कोणत्याही परिस्थितीत पुनर्स्थापन व्हावं आणि हा विचार पुढे जावा यासाठी फडणवीसांनी मोठा त्याग केला," असंही संजय कुटे म्हणाले.