शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (18:58 IST)

चारचाकी पुलाच्या खड्ड्यात पडून चोघांचा दुर्देवी अंत

पावसाचे पाणी खड्ड्यात साचून हिंगोली राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरु असताना पुलाच्या खड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना कला रात्री बाराच्या सुमारास हिंगोली सेनगाव जवळ घडली.मृत्यू झालेले चार ही जण लोणार तालुक्यातील खळेगाव,पळखेला येथील रहिवाशी आहेत.
 
त्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगत आहे.या खड्ड्यात वेगाने चालणारी चारचाकी पडली त्यामुळे त्या गाडीत बसलेल्या चौघांचा जीव खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे समजले.पुढील तपास कार्य सुरु आहे.  
 
मयत झालेले विजय ठाकरे,गजानन सानप,त्र्यंबक थोरवे आणि एक अजून लोणारच्या रहिवासी असे आहे .रस्त्यावर कोणतीही वाहतूक नसल्याने हा प्रकार फार उशिरा समजला आणि त्यांना मदत मिळे पर्यंत खड्याच्या पाण्यात बुडून चोघांचा दुर्देवी अंत झाला.