शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (19:30 IST)

राज्यात मान्सून सक्रिय ,हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला

राज्यात मान्सून सक्रिय होऊन पुढील काही दिवस पाऊस जोरदार येईल त्यामुळे अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याकडून आला आहे.मुबंईत सकाळ पासून जोरदार पाऊस असल्याने मुंबईकरांचे त्रेधा तिरपीट होत आहे. 
 
कोकणात देखील मुसळधार पावसासह ढगफुटी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे.मुंबई,पालघर,ठाणे,रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस येण्याचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे तसेच पावसासह जोरदार वारे असण्याचे देखील सांगितले आहे.
 
रत्नागिरीत देखील 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे त्याच सह हा पाऊस ढग फुटी प्रमाणे असल्याचे देखील सांगत आहे.मुंबईत देखील पाऊसामुळे लोकांची चांगलीच धांदल उडाली आहे. सर्वी कडे पाणीच पाणी झाल्यामुळे लोकांना वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे.