सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (17:00 IST)

हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक वाग्युद्ध अद्याप सुरूच आहे.  चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पिंजऱ्यातल्या वाघ म्हटलं. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. तसंच हे आमंत्रण देत असताना हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
 
संजय राऊत नंदुरबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,” असं आव्हान संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांना दिलं.