मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (07:52 IST)

जे साहस ठाकरेंनी दाखवले तेच साहस पवारांनीही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवले पाहिजे

courage
अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता है।” असं त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “जे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे… तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
 
तसेच, “आता सर्व चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे आणि हत्या की कोणाच्या दबावामुळे आत्महत्या हे सर्व जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार ही मागणी केली होती की धनंजय मुंडेच्या मुद्द्यावरही हाच निर्णय घेतला गेला तरच सरकारची थोडीफार इज्जत वाचू शकते. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पाऊल उचललंच पाहिजे. जनता, भाजपा आणि मीडिया या सर्वांच्या दबावामुळेच हा राजीनामा दिला गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या परंपरेनुसार पूजा चव्हाणला आधीच न्याय द्यायला हवा होता. असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.”